सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍याची सेवा करतांना होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासावर ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक उपाय !

॥ ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ॥ 

श्री. निषाद देशमुख यांना सूक्ष्म ज्ञानाचे टंकलेखन करतांना किंवा सूक्ष्म परीक्षण करतांना होणारे त्रास आणि त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍याने झालेले लाभ येथे पाहूया.

श्री. निषाद देशमुख

१. श्री. निषाद देशमुख यांना होणार्‍या शारीरिक त्रासाचे स्‍वरूप, त्‍यामागील कारणे आणि ते दूर होण्‍यासाठी केलेले स्‍थूल आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय

टीप १ – दोन्‍ही हातांच्‍या मधल्‍या बोटांची टोके जुळवून मनोर्‍यासारखी (टॉवरसारखी) हाताची मुद्रा करणे

टीप २ – दोन्‍ही हातांची नमस्‍काराची मुद्रा करून दोन्‍ही भुजा सरळ ठेवून डोक्‍यावर धरणे. प्राचीन काळी अशी मुद्रा करून आणि एका पायावर उभे राहून ऋषी तप करायचे. त्‍यामुळे या मुद्रेला ‘ऋषी मुद्रा’ असे म्‍हटले आहे.’

– श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), फोंडा, गोवा. (३१.१.२०२४, दुपारी ४.१५ ते ५.२५)                 

(क्रमशः)

 ॥ ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ॥

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक