कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !
ठाणे : मागील ६४ वर्षे प्रलंबित असलेल्या कल्याण येथील दुर्गाडी गडावरील मंदिराविषयीचा महत्त्वपूर्ण निर्णय कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. दुर्गाडी गडावरील वास्तू ही ‘मशीद’ नसून ‘मंदिर’ असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे समस्त हिंदु धर्मप्रेमी आणि गड-दुर्गप्रेमी यांनी स्वागत केले आहे. दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन देवीची आरती करून सर्व धर्माभिमानी हिंदूंनी या निर्णयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
🏯 Victory for Hindus: Durgadi Fort Structure Ruled a Temple!
In a landmark verdict, the Kalyan District and Sessions Court has confirmed that the structure at Durgadi Fort in Kalyan, Thane district, is indeed a temple! 🏛️
This ruling is a significant win for Hindus who have… pic.twitter.com/wDxbXllqng
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2024
जिल्हाधिकार्यांनीही दिला होता हिंदूंच्या बाजूने निर्णय !
वर्ष १९६० मध्ये दुर्गाडी गडावरील वास्तू मशीद असल्याचा दावा मुसलमानांनी केला होता. याविषयी वर्ष १९७३ मध्ये ठाणे जिल्हाधिकार्यांपुढे ‘ही वास्तू मशीद आहे कि मंदिर आहे ?’ याविषयी न्यायनिवाडा झाला. या वेळी ही वास्तू ‘मंदिर’ असल्याचे पुरावे हिंदूंनी शासनाला सादर केले. या वेळी जिल्हाधिकार्यांनी ही वास्तू मंदिर असल्याचा निर्णय दिला. जिल्हाधिकार्यांनी ‘ही वास्तू श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे आणि या मंदिरात पूर्वापार पूजा-अर्चा चालू आहे’, असे सांगितले होते.
गडावर कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी शासनाची अनुमती घेण्याची न्यायालयाची सूचना !
दुर्गाडी गडावरील वास्तू मंदिर असल्याच्या जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाला मुसलमानांनी कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. ‘दुर्गाडी गडाची जागा शासनाची असून गडावर कोणताही धार्मिक विधी करायचा झाल्यास शासनाकडून अनुमती घ्यावी लागेल’, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.
हिंदूंच्या वतीने अधिवक्ता भिकाजी साळवी आणि अधिवक्ता सुरेश पटवर्धन यांनी मांडली न्यायालयात बाजू !
दुर्गाडी गडावरील वास्तू ‘मंदिर’ असल्याच्या बाजूने महाराष्ट्र शासन आणि हिंदु समाजाच्या वतीने अधिवक्ता देण्यात आले होते. हिंदूंच्या वतीने अधिवक्ता भिकाजी साळवी आणि अधिवक्ता सुरेश पटवर्धन यांनी न्यायालयात बाजू मांडली. मुसलमानांकडून दुर्गाडीवर दावा केल्यावर हिंदु समाजाकडून प्रतिवादी म्हणून ७ जणांची नावे दिली होती. त्यांतील ६ जणांचे निधन झाले. त्यानंतर हिंदु समाजाकडून प्रतिवादी म्हणून आणखी २२ जणांची नावे देण्यात आली होती. ही न्यायालयाने मान्य केली होती.
दुर्गाडी गड ‘वक्फ मंडळा’ची जागा असल्याचा दावा !
वर्ष २००४ मध्ये दुर्गाडी गड हा वक्फ मंडळाची जागा असल्याचा दावा वक्फ मंडळाने केला. वर्ष २०१६ मध्ये दुर्गाडी गडावरील वास्तूविषयीचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी वक्फ मंडळाने न्यायालयात केली; मात्र वर्ष २०२२ मध्ये न्यायालयाने वक्फ मंडळाचा अर्ज फेटाळला.
धार्मिक स्थानाच्या रक्षणासाठी समर्पित भावाने लढा देणारे शिलेदार !दुर्गाडी गडावरील मंदिराचे रक्षण व्हावे, यासाठी जे न्यायालयीन लढा देत आहेत, त्यात सर्वश्री दिनेश देशमुख, सुरेंद्र भालेकर आणि पराग तेली यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. स्वत:चा वेळ व्यय करून हे न्यायालयात दुर्गाडी गडावरील मंदिराच्या रक्षणासाठी वर्षानुवर्षे लढा देत आहेत. यांतील श्री. दिनेश देशमुख हे मलंगगडावरील श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीच्या रक्षणासाठीही न्यायालयीन लढा देत आहेत. धर्मादाय आयुक्तांनी श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे ‘श्री पीर हाजी मलंगबाबा’ असे शासकीय कागदपत्रांमध्ये नामकरण केले आहे. हे नाव पालटून श्री मच्छिंद्रनाथांच्या या समाधीस्थानाचे नामकरण ‘श्री मलंग मच्छिंद्रनाथ समाधी’ असे करावे, यासाठी श्री. दिनेश देशमुख यांनी ठाणे जिल्हा न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. सांस्कृतिक वारशांचे रक्षण करणे हे हिंदूंचे कर्तव्य ! – दिनेश देशमुख, अध्यक्ष, हिंदू मंचपूर्वजांकडून प्राप्त झालेल्या आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे. हा आपला महान इतिहास आहे. दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराच्या रक्षणाचे आम्ही व्रत घेतले आहे. प्रत्येक हिंदूने संस्कृतीच्या रक्षणासाठी योगदान देणे ही काळाची आवश्यकता आहे. |
अद्याप कथित ईदगाहचा वाद कायम !
(इदगाह म्हणजे नमाजपठणासाठीची जागा)
दुर्गाडी गडावर भिंत असून तो परिसर ईदगाह असल्याचा दावाही मुसलमानांकडून करण्यात आला आहे. वर्ष १९७३ मध्ये जिल्हाधिकार्यांनी गडावरील वास्तू मंदिर असल्याचा निर्णय देतांना तेथील भिंतीचा विषय त्यांच्यापुढे निर्णयासाठी आला नसल्याचे म्हटले. या वेळी हिंदु समाजाने गडावरील भिंत आणि परिसर ईदगाह नसल्याविषयी स्वतंत्रपणे अर्ज केला; मात्र जिल्हाधिकार्यांनी तो स्वीकारला नाही. तेव्हापासून गडावरील ही भिंत आणि त्याचा परिसर कथित ईदगाह मानून मुसलमान ईदच्या दिवशी येथे नमाजपठण करतात.
दैनिक ‘सनातन प्रभात’ ने वेळोवेळी उठवला आवाज !
महाराष्ट्रात विविध गडांवर मुसलमानांनी केलेल्या अतिक्रमणाचे छायाचित्रासह वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. यामध्ये दुर्गाडी गडावर करण्यात आलेल्या इस्लामी अतिक्रमणाचेही ठळक वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केले. दुर्गाडीवरील श्री दुर्गादेवी मंदिरावर मुसलमानांकडून ‘हक्क’ सांगण्यात आल्याच्या, तसेच कथित ‘ईदगाह’चा नावाखाली मुसलमानांकडून ‘ईद’च्या दिवशी नमाजपठण करून करण्यात येत असलेली वाहतुकीची कोंडी, ‘ईदगाह’च्या नावाखाली हिंदूंना अर्ध्या गडावर करण्यात आलेली प्रवेशबंदी याविषयीही ठळक वृत्ते दैनिक ‘सनातन प्रभात’ने वेळोवेळी प्रसिद्ध केली आहेत. याचा परिणाम म्हणजे दुर्गाडीसह महाराष्ट्रातील विविध गडांवरील इस्लामी अतिक्रमणाचे षड्यंत्र समस्त हिंदूंपर्यंत पोचले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर ९ भागांची लेखमालिका वाचा !
संपादकीय भूमिकादुर्गाडी गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लढा देणार्या प्रत्येकाचे अभिनंदन ! आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील गडांवर झालेले मुसलमानांचे अशा प्रकारचे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन गड अतिक्रमणांपासून मुक्त करावेत, अशीच गडप्रेमींची अपेक्षा आहे ! |