Bhagavad Gita Banned In Bangladesh : बांगलादेशात इस्कॉनच्या अनुयायांना भगवद्गीता वितरित करण्यास बंदी !

धोतर, सदरा घालणे, टिळा लावणे आणि ‘हरे कृष्ण’ म्हणणे यांवरही बंदी !

(इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस)

ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात हिंदू आणि त्यांच्या धार्मिक संस्था यांच्यावरील आक्रमणे वाढली आहेत. यामध्ये विशेषतः  इस्कॉनची मंदिरे आणि त्याच्या अनुयायांना लक्ष्य केले जात आहे. इस्कॉनच्या अनुयायांचे म्हणणे आहे की, आता बांगलादेशात त्यांच्या धार्मिक श्रद्धांचे पालन करणे कठीण झाले आहे. धोतर आणि सदरा घालणे, भगवद्गीता वितरित करणे, टिळा लावणे आणि ‘हरे कृष्ण’ म्हणण्यावरही आता बंदी घालण्यात आली आहे.

आमचा गुन्हा काय ?

इस्कॉनच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार बांगलादेशाची निर्मिती अशा वेळी झाली होती, जेव्हा परिस्थिती फार वाईट होती आणि इस्कॉनने तेथील लोकांना साहाय्य केले होते. आता हिंदूंवर ज्या प्रकारचे अत्याचार होत आहेत, ते पाहून त्यांचे अनुयायी घाबरले आहेत आणि त्यांचा गुन्हा काय आहे ?, हे त्यांना समजू शकलेले नाही.

इस्कॉन कुणाचेही धर्मांतर करत नाही !

इस्कॉनच्या नागपूर मंदिराच्या पुजार्‍याने या घटनेविषयी दुःख व्यक्त केले आणि हा प्रकार म्हणजे धार्मिक असहिष्णुता अन् हिंसाचार यांचे उदाहरण असल्याचे सांगितले. बांगलादेशात आता राक्षसी प्रवृत्ती असलेल्या लोकांचे वर्चस्व आहे, जे निष्पाप लोकांवर अत्याचार करत आहेत. इस्कॉन कुणाचेही धर्मांतर करत नाही किंवा कुणालाही त्यांची धार्मिक ओळख पालटण्यास भाग पाडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

  • ‘इस्कॉन’ ही आंतरराष्ट्रीय संस्था असून जगभरात तिचे कार्य मोठ्या प्रमाणात आहे. तिने याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला पाहिजे. त्याला हिंदूंचाही पाठिंबा असेल, यात शंका नाही !
  • इस्कॉनकडून रमझानच्या काळात मंदिरांमध्ये इफ्तारच्या मेजवान्या आयोजित केल्या जातात; मात्र त्या बदल्यात त्यांना काय मिळत आहे ? यावरून त्यांनी आता तरी शहाणे होणे आवश्यक आहे. त्यांनीच नाही, तर सर्वच हिंदूंनी यातून धडा घेतला पाहिजे !