(‘७८६’ ही संख्या मुसलमानांसाठी पवित्र संख्या आहे)
बरेली (उत्तरप्रदेश) : येथील गोठा खंडुआ गावात दिवाळीच्या दिवशी माता गामा देवीच्या मंदिरावर ‘७८६’ लिहिल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. पोलिसांनीही घटनेचे अन्वेषण चालू केले आहे. मंदिरावर ‘७८६’ लिहिलेल्या जागेवर रंग लावण्यात आला आहे.
फटाके फोडणार्या हिंदूच्या घरावर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक
बरेलीच्या हाफिजगंज पोलीस स्टेशन परिसरात दिवाळीत फटाके फोडणार्या सचिन नावाच्या हिंदु तरुणाच्या घरावर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने दगडफेक केली. तसेच सचिनच्या घरासह अन्य हिंदूंच्या घरांना आग लावण्याची धमकी दिली. सचिन याने केलेल्या तक्रारीत त्याचेे शेजारी नसीर, इम्रान अन्सारी आणि अनसया यांचे नाव लिहिण्यात आले आहे.
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाएखाद्या मशिदीवर किंवा दर्ग्यावर कुणी ओम किंवा स्वस्तिक काढले असते, तर देशात आगडोंब उसळला असता ! ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा दिल्या गेल्या असत्या ! |