Attack On UN Soldiers : संयुक्‍त राष्‍ट्रांचे २ सैनिक घायाळ झाल्‍यावरून भारताची चिंता वाढली !

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायल आणि इराण यांच्‍यातील संघर्षामुळे आता भारताची चिंता वाढली आहे. इस्रायलकडून चालू असलेल्‍या गोळीबारात संयुक्‍त राष्‍ट्रांचे २ शांती सैनिक घायाळ झाले होते. या शांती सैन्‍यात भारताचे ६०० सैनिक आहेत. हे सैनिक लेबनॉनमध्‍ये संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या शांती मिशनचे काम करत आहेत. हे सैनिक इस्रायल-लेबनान यांच्‍या १२० किमी लांबीच्‍या ‘ब्‍ल्‍यू लाईन’वर तैनात आहेत.

१. भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटले की, संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या परिसराचा सर्वांनी सन्‍मान ठेवला पाहिजे आणि संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या शांती सैनिकांच्‍या सुरक्षेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

२. लेबनॉन आणि हिजबुल्लाह यांच्‍या विरोधात इस्रायलचा संघर्ष चालू आहे. या परिस्‍थितीत दक्षिण लेबनॉनच्‍या सीमेवर शांती प्रस्‍थापित करण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्रांची ‘युनिफिल’ची (‘युनायटेड नेशन्‍स इंटिरिम फोर्स इन लेबनॉन’ची) एक तुकडी तैनात आहे.