IAS Niyaz Khan : मुसलमानांच्या वाढती लोकसंख्यामुळे जगात निर्माण झाली आहे समस्या !

मध्यप्रदेशातील भारतीय प्रशासकीय अधिकारी नियाज खान यांचा घरचा अहेर !

प्रशासकीय अधिकारी नियाज खान

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील प्रसिद्ध भारतीय प्रशासकीय अधिकारी (आय.ए.एस् अधिकारी) नियाज खान यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, जगात मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आफ्रिकेत १० मुले जन्माला येत आहेत. आपल्या देशातही हीच परिस्थिती खालच्या वर्गाची आहे.

नियाज खान यांनी मौलवी आणि मदरशांतील शिक्षण यांवरही प्रश्‍न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, यामुळे मुसलमान तार्किक विचार करू शकत नाहीत. केवळ योग्य शिक्षणच त्यावर नियंत्रण ठेवू शकते.

नियाज खान यांनी यापूर्वी मुसलमानांना गायी पाळण्याचे आवाहन करून शाकाहारी बनण्यास सांगितले होते. ‘तुम्ही कुणावरही धर्म पालटण्यासाठी दबाव आणू नका’, असेही ते म्हणाले होते.

संपादकीय भूमिका

  • जे सत्य आहे, ते धाडसाने सांगणार्‍या नियाज खान यांना उद्या ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी मिळाली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • नियाज खान यांच्या विधानाविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष काहीही बोलणार नाहीत !