गुरुबोध

प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे

१. लौकिकाचा तिरस्कारही करू नये आणि पुरस्कारही करू नये. ‘सगळे देवाचेच आहे’, या भावनेने रहावे.

२. प्रपंचातील अल्पचा अधिकपणाशी ईश्वराचा संबंध नसतो; कारण ब्रह्मतत्त्व चिरंतन आहे. तेथे अल्प-अधिकपणा नाही.

३. जडण-घडणीसाठी बिघडण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)