Kashmir Lawyer’s Killing Case : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षाला हत्येच्या प्रकरणी अटक

मियाँ अब्दुल कय्युम भट्ट

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनचा माजी अध्यक्ष मियाँ अब्दुल कय्युम भट्ट याला अटक करण्यात आली आहे. भट्ट याच्यावर त्याचे प्रतिस्पर्धी अधिवक्ता बाबर कादरी यांची लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याकरवी हत्या केल्याचा आरोप आहे. कादरी यांची हत्या करणारा आतंकवादी साकिब मंजूर हा ऑगस्ट २०२१ मध्ये चकमकीत मारला गेला. मियाँ अब्दुल कय्युम भट्ट हा फुटीरतावादी कारवायांमुळे बराच काळ कारागृहात होता.