आतंकवाद्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक कर्नाटकात !

भटकळ (कर्नाटक) – पुणे येथे घडलेल्या आतंकवादी कृत्यातील एक संशयित आतंकवादी अब्दुल कबीर सुलतान उपाख्य मौलाना सुलतान याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक कर्नाटकातील भटकळ येथे गेले आहे. भटकळमधील नवायत कॉलनीतील हाजी मंजिल येथील रहिवासी असलेला मौलाना सुलतान याचा शोध आतंकवादविरोधी पथक घेत आहे. तो पुणे येथे घडलेल्या आतंकवादी कृत्यातील आरोपी असून गेल्या एक वर्षापासून पसार आहे.

संशयित आतंकवादी मौलाना सुलतान याला अटक करून न्यायालयासमोर उपस्थित करण्यासाठी न्यायालयाने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाला सूचित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर हे पथक उत्तर कर्नाटकात गेले आहे. पथकाने त्याच्या भटकळ येथील निवासस्थानी नोटीस चिकटवली आहे. आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी आरोपीच्या अटकेसाठी उत्तर कन्नड पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.