नवी देहली – उत्तराखंड सरकारने पतंजलि आस्थापनाच्या १४ उत्पादनांचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित केला. राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, दिशाभूल करणार्या विज्ञापनाच्या प्रकरणी १५ एप्रिलला राज्य परवाना प्राधिकरणाने ‘दिव्या फार्मसी’ आणि ‘पतंजलि आयुर्वेदा’च्या उत्पादनांवर कारवाई करण्यात आली.
जिल्हा औषध निरीक्षकांनी १६ एप्रिलला योगऋषी रामदेवबाबा, श्री. बाळकृष्ण, दिव्या फार्मसी आणि पतंजलि आयुर्वेद यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयालाही ही माहिती देण्यात आली आहे.
पुढील उत्पादनांचा परवानाही निलंबित !
श्वासारी गोल्ड, श्वासारी वटी, श्वासारी प्रवाही, ब्रॉन्कोम, श्वासारी अवालेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत डव्हान्स, लिवोग्रिट, आयग्रिट गोल्ड आणि पतंजलि दृष्टी आय ड्रॉप, या उत्पादनांचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.