मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांच्या न्यासाचे अध्यक्ष श्री. शरद बापट यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाठवलेले पत्र

 

श्रद्धेय प.पू. डॉ. आठवलेकाका यांसी सादर सप्रेम हरि ॐ तत्सत् ।

१. आश्रमातील वास्तव्याने ‘साधकाला त्याच्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणारी एकमेव संस्था म्हणजेच ‘सनातन संस्था’ असल्याचे लक्षात येणे !

अ. आपणा सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन आम्ही सर्वजण १३.३.२०२३ या दिवशी इंदूर येथे सुखरूप पोचलो. ८.३.२०२३ ते १२.३.२०२३ हे अविस्मरणीय दिवस आम्हा सर्व भक्तवात्सल्य-आश्रमवासियांना अनोखे, अद्भुत आणि अविस्मरणीय होते आणि रहातील. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील आमचे वास्तव्य एका अतिशय सुखद आणि भारावलेल्या अवस्थेत गेले.

शरद बापट

।। हरि ॐ तत्सत् ।।

आ. आश्रमातील साधकांची दिनचर्या, प्रेमळ आणि आनंदी वागणूक, सतत सुहास्य वदनाने केलेले आमचे आदरातिथ्य आमच्या कायम लक्षात राहील. आश्रम परिसरातील स्वच्छता, पवित्रता राखणारे सर्व साधक खरोखर अभिनंदनास पात्र आहेत.

इ. स्वच्छता, शुचिता, अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आमच्या लक्षात आले. साधनामार्गातील खाचाखोचा अतिशय सूचक, चौकस आणि हळूवार प्रेमाने सूचित करून साधकाला त्याच्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणारी एकमेव संस्था म्हणजेच ‘सनातन संस्था’ आहे. व्यष्टीकडून समष्टीकडे वाटचाल करणार्‍या साधनामार्गाचा स्वेच्छेने एक ‘व्रती’, म्हणून स्वीकारलेले साधकांचे विश्रांतीस्थान म्हणजे, ‘सनातन संस्था’ याची जाणीव झाली.

२. तन, मन आणि धन समर्पित केलेल्या साधकांच्या कार्याला तोड नाही !

अ. तन, मन आणि धन समर्पित केलेले साधक श्री. दिनेश शिंदे, सौ. प्रियांका राजहंस, सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. मंगला मराठे यांच्या कार्याला तोड नाही. त्यांचे अतिशय प्रेमाने ओथंबलेले, अतिशय हसतमुख, विनम्र मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळाले. त्यांचे किती आभार मानू ! त्यांच्या निष्ठेला, श्रद्धेला आणि समर्पणभावाला आमचे विनम्र अभिवादन !

आ. सर्वांत महत्त्वाचा विभाग, म्हणजे भोजनव्यवस्था ! पू. रेखाताई काणकोणकर यांच्या शिस्तबद्ध, रेखीव आणि स्वच्छतापूर्ण व्यवस्थापनाने विलक्षण अन् अद्भुत अनुभव आम्हास पहाण्यास मिळाले. त्या साक्षात् अन्नपूर्णामाताच आहेत. त्याचप्रमाणे साधक श्री. आकाश कदम, कु. कोमल पाटील (आताच्या सौ. मनस्वी मेहुल राऊत) आणि कु. वैष्णवी गुरव यांची आठवण आम्हाला नेहमीच येत राहील. आहाराचे संपूर्ण नियोजन अनुभवल्यावर ‘अन्नदाता सुखी भव ।’, असे विचार प्रसाद घेतांना आमच्या मनात येत होते.

इ. आश्रमातील भव्य, सुसज्ज, आधुनिक यंत्रांनी युक्त ‘स्टुडिओ’ हे आमचे विशेष आकर्षणाचे स्थान राहिले. उत्तम आणि कुशल चित्रीकरण करणारे सदा हसतमुख आणि विनम्रपणे सूचना देणारे साधक दांपत्य श्री. राजू आणि सौ.  साधना सुतार, श्री. अतुल बधाले, श्री. विनयकुमार आणि श्री. केदार नाईक यांच्या सालस अन् सोज्वळ स्वभावाचे तेव्हा दर्शनपण घडले.

ई. परमभक्त श्री. भानुदादा यांच्या सेवाभावाला तर तोडच नाही.

उ. सतत सेवाभावाने उत्स्फूर्त भावनेने काम करणारा चालकवर्ग (साधक) सर्वश्री सागर म्हात्रे, स्वप्नील नाईक, परशुराम पाटील, सूरज पाटील आणि भगवंत नाईक हे नेहमी आमच्या सर्वांच्याच लक्षात रहातील.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा जयजयकार असो ! जास्त काय लिहू ?

आपला नम्र,

शरद बापट, अध्यक्ष, श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, भक्तवात्सल्याश्रम, इंदूर, मध्यप्रदेश.


‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी ईश्वराने अवतार म्हणून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाठवले !

भारताचार्य सु.ग. शेवडे

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा आणि माझा परिचय पुष्कळ जुना आहे. पुष्कळ पूर्वी माझ्यासमवेत ते एकदा बद्री केदारनाथ यात्रेलासुद्धा आले होते. तेव्हा माझे यात्रेचे एक आस्थापन होते आणि आमचा एक छान योग जुळून आला होता. त्यांच्याकडून सनातन संस्थेचे एवढे धर्मकार्य उभे राहिले, हे माझ्यासाठी पुष्कळ अभिमानास्पद आहे.

आज केवळ ‘हिंदुत्व, हिंदुत्व’ म्हणून घंटा बडवणारा हिंदु आमचा नाही किंवा अशा प्रकारची अनेक वक्तव्ये करणारी मंडळी स्वतःला तथाकथितपणे हिंदुत्वनिष्ठ समजतात. हिंदुत्वनिष्ठ म्हणजे काय ? हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. खरे तर धर्मनिष्ठता हीच हिंदुत्वनिष्ठता आहे. हिंदु हा जगामध्ये एकमेव धर्म आहे; बाकी सर्व पंथ आहेत. माझे अमेरिकेच्या ‘जागतिक हिंदू परिषदे’मध्ये वर्ष १९८० मध्ये जे व्याख्यान झाले, त्यात मी वरील वाक्य उच्चारल्यावर तेथील लोक अत्यंत खुश झाले. धर्माचा पर्यायवाची शब्द इंग्रजी डायरीत नाही; कारण तेथील लोकांना धर्माची मूळ व्याख्याच ठाऊक नाही.

अशा स्थितीमध्ये या आपल्या सनातन धर्माचे नाव आपल्या संस्थेला देऊन ही संस्था धर्माच्याच मार्गाने वाटचाल करत आहे. हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रकट केले. खडतर परिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी शाखा स्थापून, कार्यकर्ते गोळा करून ठिकठिकाणी व्याख्याने, प्रवचने, धर्माचे कार्यक्रम आयोजित करून ‘सनातन प्रभात’सारखे वर्तमानपत्र चालवून जे धर्मकार्य केले, त्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत. माझा संपूर्ण पाठिंबा आहे आणि किंबहुना न्यून कालावधीत आपल्या संस्थेचा व्याप उत्तम प्रकारे त्यांनी वाढवला अन् तो वाढत जाणे आपल्या सर्वांसाठी इष्ट आहे.

‘हिंदु धर्माचे ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून स्थापन व्हावे’, ही भगवंताची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने काही जण आज कार्य करत आहेत. त्यात ईश्वराने अवतार म्हणून ज्यांना पाठवले, त्यामध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे आहेत’, असे मी मानतो. ‘पुढील वर्षी आपला हिंदुस्थान हा हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणार’, असे मला वाटत आहे आणि या धर्मकार्यात सनातन संस्थेचाही सुंदर हात आहे. हे बघून मला अत्यानंद वाटतो. म्हणून सनातन संस्थेच्या कार्याला माझ्या उत्तमोत्तम सदिच्छा !

– भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.


साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हाच सनातन संस्थेचा उद्देश !

(पू.) अधिवक्ता हरि शंकर जैन

‘भारतीय गणराज्याच्या क्षितिजावर अंध:कार पसरला होता. तेव्हा सूर्याचे किरण दिसावे, तसे वर्ष १९९१ मध्ये सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या माध्यमातून युगद्रष्टे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देशाच्या कलुषित धर्मनिरपेक्षतावादाच्या विरोधात जनतेला हिंदु राष्ट्रवाद दाखवण्याचे कार्य चालू केले. त्यांनी संदेश दिला की, ‘हिंदु राष्ट्र बनवण्यातूनच देशाचे अभिष्ट होऊ शकते, तसेच धर्मनिरपेक्षतावादी राजकारण केवळ धनप्राप्ती, सत्ताप्राप्ती आणि कलुषित राजकीय विचारसरणी यांचेच पोषण करू शकते. सहकार्य, समर्पण, संयम आणि अध्यात्म यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रवाद प्राप्त करता येतो.’ हा संदेश परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार आणि ओजस्वी वक्तव्य यांच्या माध्यमातून जनमानसाला मिळाला.

भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आदी विविध योगमार्गांतील साधकांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे, हा वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. एवढेच नव्हे, तर हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्राचा शास्त्रीय परिभाषेत प्रसार करणे, हा सनातन संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख उद्देश आहे. देशाच्या राज्यघटनेत ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी सनातन संस्था समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अखंड प्रयत्न करते.

ऋषिमुनी आणि संत-महंत यांच्या मान्यताप्राप्त धर्मशास्त्राला आधारभूत समजून समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या उन्नतीसाठी कार्य करणारी सनातन संस्था ही प्रमुख संस्था आहे. मी गेली ९ वर्षे या महान संस्थेशी जोडला गेलो आहे, तसेच प्रत्येक वर्षी सनातनच्या आश्रमाला भेट देतो. तेथे गेल्याने जी आध्यात्मिक अनुभूती अनुभवास येते, तिचे वर्णन शब्दांत करता येणे अशक्य आहे. तेथे लोकांचे आचार-विचार, शिस्त, स्वच्छता, मिळूनमिसळून रहाणे, नम्रता, साधेपणा आणि सनातन परंपरा यांचा अद्भुत संगम पहायला मिळतो. तेथे मला चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती येते.

या संस्थेचा उद्देश सनातन धर्माला अक्षुण्ण (अखंड) ठेवणे, तसेच सनातन समतामयी, धर्मवादी, प्रबळ आणि प्रखर अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा आहे.

– (पू.) अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय


सनातन संस्था भारतियांना शिक्षित करण्याचे काम करते !

(निवृत्त) बिग्रेडियर हेमंत महाजन

‘सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त तिच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा ! सनातन संस्था अनेक उपक्रम राबवते. त्यात ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही सर्व नियतकालिके ‘हार्डकॉपी’ आणि ‘ई-कॉपी’ मध्ये उपलब्ध आहेत. त्यात राष्ट्र-धर्म या सदरामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध लेख प्रसिद्ध होतात, तसेच संपादकीयही असते. त्यात अत्यंत महत्त्वपूर्ण लिखाण केलेले असते. त्याचा अर्थ असा की, भारताची सुरक्षा ही देशाचे नागरिक किती दक्ष आहेत ? यावर अवलंबून असते. आता देशाची सुरक्षा करणे, हे केवळ पोलीस किंवा सैनिक यांचे दायित्व राहिलेले नाही. सुरक्षेची आव्हाने ही प्रत्येक क्षेत्रात आहेत. आर्थिक सुरक्षा, आर्थिक युद्ध, सायबर युद्ध, अपप्रचार युद्ध अशी विविध प्रकारची युद्धे चीन आणि पाकिस्तान ही शत्रूराष्ट्रे देशाविरुद्ध करत असतात. त्यांना तोंड द्यायचे असेल, तर केवळ सुरक्षा यंत्रणांनी काम होणार नाही, तर त्यात प्रत्येक भारतियाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने समाजाला शिक्षित करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ वर्तमानपत्र आणि सनातन संस्था करत असते. त्यासाठी त्यांचे अभिनंदन आणि सनातन संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा !’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे


ईश्वरी पाठबळ असल्याविना एवढे मोठे कार्य होणे शक्यच नाही !

वैद्य परीक्षित शेवडे

साधारणपणे सगळ्या पंथांमध्ये धर्मशिक्षणाची व्यवस्था असते; मात्र आताच्या परिस्थितीत आपल्या (हिंदु) धर्माविषयी ही सगळ्यात मोठी कमतरता आहे. हिंदु धर्मात धर्मशिक्षणाची कोणतीही व्यवस्था नाही. नेमक्या याचविषयी पुष्कळ मोठे भरीव काम हे सनातन संस्थेने केलेले आहे.

सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्यांची एकंदरीत या सगळ्यामध्ये असलेली वाटचाल, ही त्याची प्रत्यक्ष साक्ष आहे. केवळ बोलणे, लिहिणे असे नव्हे, तर प्रत्यक्ष भूमीवर (समाजामध्ये जाऊन) काम करून वेगवेगळ्या आव्हानांना आणि संकटांना यशस्वीपणे सामोरे जात एवढ्या वर्षांची असलेली वाटचाल हा ईश्वरी संकेत आहे. ईश्वरी पाठबळ असल्याविना एवढे मोठे कार्य होणे शक्यच नाही.

आयुर्वेदाविषयी सनातन संस्थेचा जो पाठिंबा असतो किंवा जे पाठबळ असते अथवा त्याच्याविषयी प्रोत्साहन देणे असते, आपल्या साधकांपर्यंत तो विषय सातत्याने पोचावा, यासाठी जे प्रयत्न असतात मग ते ग्रंथांच्या किंवा अन्य माध्यमांतून असतील, ते पुष्कळ महत्त्वाचे आहेत. सनातन संस्थेच्या वतीने कार्यक्रमासाठी जेव्हा मला वक्ता म्हणून बोलावले जाते, तेव्हा त्या कार्यक्रमाचे नियोजन हे अतिशय शिस्तबद्ध असते. अतिशय सात्त्विक वातावरणात पार पडणारे कार्यक्रम आणि अतिशय शिस्तबद्ध असणारे नियोजन हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या संस्थेची जडणघडण होत असतांना त्याविषयी समर्पित असणारे साधक असणे, याविषयी सामाजिक माध्यमांतूनही मी पूर्वी लिहिलेले आहे.

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’ (दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६), या समर्थ रामदासस्वामींच्या ओवीप्रमाणे भगवंताचे अधिष्ठान सनातन संस्थेला असल्यामुळे हे सर्व कार्य घडून येत आहे’, असा मला विश्वास आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.


सनातन संस्था करत असलेले कार्य अद्भुत आणि अद्वितीय !

श्री. विनोदकुमार सर्वाेदय

भारतातील आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे रक्षण करत भारतियांना सदैव कार्यरत / जागृत ठेवण्यासाठी संघर्ष करणारी ‘सनातन संस्था’ रौप्य महोत्सव साजरा करत आहे. आपणा सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. या शुभप्रसंगी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालकत्वात फुललेल्या सनातन संस्थेविषयी बोलण्यासाठी माझी वाणी असमर्थ आहे.

मी साधारण १२ वर्षांपासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहे, हे माझे सौभाग्य आहे. संस्थेचे सर्व सद्गुरु, संत आणि साधक यांना भेटल्यावर जी आत्मीयता अनुभवता येते, ती अवर्णनीय आहे. हिंदूंना आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ऊर्जा प्रदान करून धर्मरक्षणार्थ सतत संघर्ष करण्याचे जे अद्भुत कार्य सनातन संस्था करत आहे, ते अद्वितीय आणि अतुलनीय आहे. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मी संस्थेच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करत, सर्व देवतांना हात जोडून प्रार्थना करतो, ‘त्यांनी आम्हा सर्व राष्ट्रनिष्ठांना अशी सद्बुद्धी, समृद्धी आणि शक्ती द्यावी की, ‘भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या सनातन संस्थेच्या ध्येयामध्ये यथाशक्ती आमचाही सहभाग असावा.’

– धर्मरक्षणार्थ समर्पित श्री. विनोद कुमार सर्वोदय, राष्ट्रवादी चिंतक आणि लेखक, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.


सनातन संस्थेविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

अग्नीदिव्यातून वाटचाल करत २५ वर्षे पूर्ण करणारी सनातन संस्था !

श्री. शरद पाेंक्षे

आज अतिशय आनंदाचा दिवस ! सनातन संस्था म्हटले की, डोळ्यांसमोर अनेक गोष्टी येऊन जातात. सनातन संस्थेचे कार्य फार मोठे आहे. हिंदु धर्माचा प्रसार करत धर्माला सर्वसामान्यांपर्यंत पोचवणे, हिंदु धर्माची व्याप्ती, धर्माची ज्ञानसंपदा आणि धर्माचे शास्त्र हे सगळे या सनातन संस्थेच्या वतीने सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोचवले जाते. अशा या संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवानिमित्त हार्दिक अभिनंदन !

काही वर्षांपूर्वी कार्यक्रमाच्या निमित्ताने मला रामनाथी (गोवा) आणि पनवेल येथील आश्रमांमध्ये जाण्याचा योग आला. तेथे गेल्यावर असे कळले की, स्वतःचे सर्व कामधंदे सोडून पूर्णपणे २४ घंटे असे गोव्याला जवळजवळ २५० हून अधिक आणि पनवेलला जवळजवळ १०० हून अधिक साधक पूर्णपणे हिंदु धर्माचा प्रसार अन् प्रचार करण्यासाठी आश्रमामध्ये आहेत. अतिशय शांत आणि चांगल्या पद्धतीने कार्य चालू आहे.

हिंदु धर्म, वेद, पुराण, कथा, देवतांच्या गोष्टी यांमध्ये असलेले सगळे संस्कार सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे सगळे संस्कार लोकांपर्यंत पोचवणे आणि हिंदु धर्माचा प्रसार करणे अन् या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार केवळ अहिंदूंना नाही, तर तो अधिकार राज्यघटनेने हिंदूंनासुद्धा दिलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, बहुसंख्य असलेल्या या हिंदु राष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये हिंदु धर्माचे संस्कार पोचवण्यासाठी एका सनातन संस्थेची स्थापना करावी लागते. संस्थेला प्रचंड विरोध झाला. जगामध्ये कुठेही काही घडले, तरी त्याचे सगळे खापर सनातनवाल्यांवर फोडायचे आणि सातत्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करायची, हा प्रकार गेली २५ वर्षे चालू आहे. अशा या अग्नीदिव्यातून वाटचाल करत या सनातन संस्थेने २५ वर्षे पूर्ण केली; म्हणून तिचे विशेष अभिनंदन !

– श्री. शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, मुंबई.


हिंदुस्थानात हिंदु संस्कृतीच्या संवर्धनाविषयी अत्यंत व्यापक कार्य करणारी सनातन संस्था !

डॉ. पांडुरंग बलकवडे

‘सनातन संस्था मागील २५ वर्षांपासून आपल्या हिंदुस्थानात भारतीय हिंदु संस्कृतीचे संवर्धन करण्याविषयी अत्यंत व्यापक कार्य करत आहे. जेव्हा जेव्हा हिंदु समाज किंवा संस्कृती यांवर आघात होतो, तेव्हा तेव्हा सनातन संस्था त्यांच्या रक्षणासाठी पुढे सरसावते. संपूर्ण हिंदुस्थानात हिंदु समाजाला संघटित करणे, त्यांना सक्षम करणे, हिंदु संस्कृतीचे शत्रू कोण आहेत ? हे दाखवून त्यांना त्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उभे करणे, हे कार्य सनातन संस्थेच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून चालू आहे. मी सनातन संस्थेला तिच्या या महान कार्यासाठी धन्यवाद देतो आणि भविष्यात आणखी जोमाने हे कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो !

– डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक, पुणे.


सनातन संस्थेचे हिंदु धर्मप्रसाराचे कार्य पाहून अभिमान वाटतो !

‘सनातन संस्थेचे हिंदु धर्मप्रसाराचे कार्य पाहून अभिमान वाटतो. सनातन संस्था हिंदु धर्मासाठी करत असलेले कार्य पाहून मी प्रभावित झालो. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमामध्ये असलेल्या साधकांमधील शिस्त, त्याग आणि ते समर्पित भावाने करत असलेली सेवा पाहून मी भारावून गेलो आहे. सनातनच्या या आश्रमासाठी मीही योगदान देईन.’ – श्री. प्रदीप व्ही. सावंत, ‘प्लेसमेंट कन्सल्टंट’ आणि तेलंगाणामधील ‘मास्टर सी.व्ही.व्ही. मेडिटेशन सेंटर’चे श्री. पी. पद्मनाभ भट गुरुजी यांचे भक्त, ठाणे.