Javed Khan Molested Girls : सहलीच्या वेळी बसमध्ये लहान मुलींचा विनयभंग करणार्‍या जावेद खानला अटक !

  • ठाणे येथील प्रथितयश ‘सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूल’च्या संदर्भातील प्रकार !

  • खानकडे जेवण पुरवण्याचे होते काम !

  • मुख्याध्यापकांवर कारवाई होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय !

ठाणे – येथील प्रथितयश ‘सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूल’ या शाळेची सहल एका ठिकाणी गेली होते. वाटेत जावेद खान (वय २७ वर्षे) या भोजन पुरवणार्‍या वासनांधाने बसमध्ये बसलेल्या लहान मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बसमध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांवरही शाळा प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया चालू आहे.

काही मुलींनी संबंधित घटनेची माहिती पालकांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात ठिय्या मांडला. या वेळी मनसेचे नेते अविनाश जाधव आणि शिवसेनेचे माजी नगसेवक संजय भोईर हेही शाळेत उपस्थित होते. ‘जोपर्यंत शाळा व्यवस्थापक मुख्याध्यापकांवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही’, असा निर्णय पालकांनी घेतला. (पालकांना असा निर्णय घ्यावा लागणे दुर्दैवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्‍लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !