भारतीय नौदलाने २ मासांमध्ये नौकांवरील १७ आक्रमणे रोखली ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

दुबई – गेल्या २ मासांपासून लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांसह या संपूर्ण मार्गामध्ये भारतीय नौदलाने १७ नौकांची समुद्री दरोडेखोरांपासून सुटका केली. या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, आपल्यासोबत वाईट गोष्टी घडत राहिल्या, तर ‘त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही’, असे आपण म्हणू शकत नाही.

लाल समुद्रातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील २० देशांच्या कृती दलाने कारवाई चालू केली असली, तरी त्यात भारताचा सहभाग नाही. भारत एडनचे आखात आणि अरबी समुद्र येथे नौकांचे संरक्षण करत आहे.