लंडन (ब्रिटन) – ‘द टाइम्स’ या दैनिकाने केलेल्या सर्वेक्षणात ब्रिटनच्या ‘चर्च ऑफ इंग्लंड’च्या ५३.४ टक्के पाद्य्रांनी समलैंगिक विवाहाचे समर्थन केले आहे, तसेच त्यांनी यासाठी चर्चच्या कायद्यात पालट करण्याची मागणीही केली आहे; मात्र ३६.५ टक्के पाद्य्रांनी समलैंगिक विवाहाला विरोधही केला आहे.
१. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये वर्ष २०१४ मध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. त्या वेळी ५१ टक्के पाद्य्रांनी याचा विरोध केला होता, तर ३९ टक्के पाद्य्रांनी समर्थन केले होते.
२. आताच्या सर्वेक्षणात ६४.५ टक्के पाद्य्रांचे म्हणणे आहे, ‘समलैंगिकतेला पाप किंवा ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या विरोधात समजले जाऊ नये.’ ‘समलैंगिकतेमधील लैंगिक संबंधांविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही’, असे ३७.३ टक्के पाद्य्रांनी म्हटले आहे.
चर्च ऑफ इंग्लैंड के 64% पादरियों का कहना है कि समलैंगिक संबंधों को पाप या उनके मजहबी ग्रन्थों के खिलाफ नहीं माना जाना चाहिए।https://t.co/tQcp518Wms
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 2, 2023
ब्रिटनला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ म्हणू नये ! – ७५ टक्के पाद्य्रांचे मत‘द टाइम्स’ या दैनिकाने केलेल्या सर्वेक्षणातून ब्रिटनमधील ७५ टक्के पाद्य्रांनी म्हटले आहे की, आता ब्रिटनला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ म्हटले जाऊ नये, तर ६४ टक्के पाद्य्रांचे म्हणणे आहे की, ब्रिटनला ऐतिहासिकदृष्ट्या ‘ख्रिस्ती राष्ट्र’ म्हणता येईल; मात्र सध्याच्या स्थितीत त्याला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ म्हणू नये. |
संपादकीय भूमिकापाद्य्रांकडून मुले, महिला यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या शेकडो घटना आतापर्यंत उघड झालेल्या असल्याने पाद्य्रांकडून यापेक्षा वेगळ्या विचारांची अपेक्षाच करता येणार नाही ! |