‘सूर्योदयापासून ६ घटिकांहून (१४४ मिनिटांहून) अधिक असणारी आणि भद्रा (टीप) रहित अशा श्रावण पौणिर्मेच्या दिवशी अपराण्हकाळी किंवा प्रदोषकाळी रक्षाबंधन करावे’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
टीप – ‘विष्टि’ नामक करणाला भद्रा म्हणतात. करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. भद्रा करण अशुभ मानले जाते.
अ. ३१.८.२०२३ या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी ७.०६ वाजता संपणार आहे. ती सूर्योदयापासून ६ घटिकांहून (१४४ मिनिटांहून) अधिक वेळ नाही; त्यामुळे ३१.८.२०२३ या दिवशी रक्षाबंधन करता येणार नाही.
आ. ३०.८.२०२३ या दिवशी सकाळी १०.५९ वाजता पौर्णिमा प्रारंभ होत आहे. या दिवशी भद्राकाळ हा सकाळी १०.५९ ते रात्री ९.०२ या कालावधीत असल्याने या वेळेतही रक्षाबंधन करता येणार नाही.
इ. अशा वेळी भद्राकाळातील ‘भद्रापुच्छ’ या मुहूर्ताद्वारे ही अडचण सुटू शकते. ‘भद्राकाळातील भद्रापुच्छ हा काळ प्रसंगविशेषी शुभ समजावा’, असे मुहूर्त ग्रंथांमध्ये लिहिले आहे.
ई. ३०.८.२०२३ या दिवशी भद्रापुच्छाची वेळ सायंकाळी ५.१८ ते ६.३० अशी आहे. त्यामुळे या वेळेत रक्षाबंधन करावे.’
– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.८.२०२३)