हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात तीव्र लढा आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक

मोहन गौडा, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक

रामनाथ देवस्थान – प्रत्यक्षात मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्लामी संकल्पना आज शाकाहारी पदार्थ, औषधे, रुग्णालये, इमारती, उपाहारगृहे, पर्यटन, संकेतस्थळे आदी प्रत्येक क्षेत्रांत लागू करण्यात आलेली आहे. केवळ विदेशीच नाही, तर ‘हलदीराम’, ‘बिकानो’ यांच्यासारखी शाकाहारी पदार्थ बनवणारी भारतीय आस्थापनेही हलाल प्रमाणित खाद्यपदार्थ ग्राहकांना विकत आहेत. हलाल पदार्थांची मागणी केवळ १४ टक्के मुसलमानांची असतांनाही बहुसंख्य हिंदू, तसेच शीख, जैन, बौद्ध, ख्रिस्ती आदी ८६ टक्के जनतेवर ही हलाल उत्पादने लादली जात आहेत.

 

भारतात राज्यघटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिलेले असतांनाही हिंदूंवर केल्या जाणार्‍या हलालसक्तीच्या विरोधात, तसेच हलालच्या नावे चालू असणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जनजागृती करण्याची मोहीम मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. तसेच हा जिहाद थांबवण्यासाठी देशभरातील हिंदुत्वनिष्ठ, कायदेविषयक, तसेच सामाजिक क्षेत्रांतील आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन विविध राज्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना केली जात आहे. एवढ्यावरच न थांबता हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात अधिक तीव्र लढा आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.