गेल्या काही वर्षांत ‘जर्मन शेफर्ड’ म्हणून संबोधल्या जाणार्या एका यू ट्यूबरची प्रसिद्धी प्रचंड वाढली. हा यू ट्यूबर केवळ मोदीद्वेषच नाही, तर भारत आणि हिंदु धर्म यांच्याविरुद्ध अत्यंत चतुराईने अपप्रचार करतो. याच्या प्रसिद्धीमागील कारणांचा शोध घेतला असता लक्षात येते की, त्याच्या पाठीशी साम्यवादी ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) कार्यरत आहे. इस्लामचे गाढे अभ्यासक नीरज अत्री यांनी नुकत्याच ‘प्राच्यम्’ या हिंदु वाहिनीच्या ‘पॉडकास्ट’द्वारे हा महत्त्वपूर्ण खुलासा केला. त्यांच्या मते आज अडीच कोटी लोकांहून अधिक अनुयायी (फॉलोअर्स) असलेल्या ध्रुव राठी नावाच्या या यू ट्यूबरचे अवघे ६ लाख अनुयायी असतांना राविश कुमार, विनोद दुआ यांसारख्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी त्याला त्यांच्या ‘प्राईम टाईम’ कार्यक्रमांत बोलावले. तेथे त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे त्याच्या यूट्यूब खात्याचे अनुयायी एका रात्रीत अक्षरश: काही पटींनी वाढले.
अत्री पुढे सांगतात की, या जोडीलाच राठी याच्या लोकप्रियतेमागे इस्लामी यंत्रणाही कार्यरत आहे. त्याने एखादा व्हिडिओ प्रसारित केला की, देशभरातील मुसलमानांच्या व्हॉट्सॲप गटांवर त्याची लिंक प्रसारित केली जाते. प्रत्येक मुसलमानाला त्या व्हिडिओला ‘लाईक’, ‘शेअर’, ‘कॉमेंट’ करण्यासह तो संपूर्ण पहाण्यास सांगण्यात येते.
२० कोटी भारतीय मुसलमानांपैकी किमान धर्मांध मुसलमानांनीही या आदेशाचे पालन केले, तरी ही संख्या लक्षावधी असणार. मुसलमानांचा संघभाव ही काही नवीन गोष्ट नाही; परंतु त्यांच्या या प्रयत्नांचा परिणाम असा होतो की, यू ट्यूबचे ‘अलगोरिदम्’ राठी याचे व्हिडिओज पुष्कळ लोकप्रिय असल्याचे समजून त्याला कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवते. त्यामुळे त्याच्या अनेक व्हिडिओजना १ कोटींहून अधिक दर्शकसंख्या लाभते. एप्रिल-मे २०२४ मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ २४० जागा मिळण्यामागे राठी याच्या व्हिडिओजचा मोठा हात होता, हे विसरून चालणार नाही.
आज भारतात १०० कोटी हिंदू असतांना हिंदूंची हातावर मोजण्याइतकीच सामाजिक माध्यमांवरील खाती प्रसिद्ध आहेत. असे असले, तरी ती खाती एकमेकांना प्रोत्साहित करतांनाही आढळत नाही. दुसरीकडे २ वर्षांपूर्वी ‘स्ट्रिंग रिव्हील्स’सारख्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ यू ट्यूब वाहिनीचे २० लाख अनुयायी असतांना यू ट्यूबने त्याच्यावर बंदी घातली. यामागेही साम्यवादी आणि इस्लामी लोकांचा हात होता. १ अब्ज हिंदूंच्या देशात हिंदूंवरील आघातांसाठी लढणार्यांची ही व्यथा आहे. काही वर्षांपूर्वी सनातन संस्था, भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, एवढेच काय, तर आमच्या ‘सनातन प्रभात’च्या फेसबुक पेजवरही बंदी लादण्यात आली. आज शस्त्रास्त्रांपेक्षा ‘माहिती युद्ध’ हे अधिक घातक असल्याने हिंदूंची कणखर नि परिणामकारक यंत्रणा निर्माण होणे आवश्यक आहे. असे झाले, तरच हिंदूंच्या ‘ऑनलाईन’ रक्षणासह ‘जर्मन शेफर्ड’सारख्यांशी दोन हात करता येतील.
सामाजिक माध्यमांवरील हिंदु खात्यांवर कारवाई आणि हिंदु विरोधकांना अभय, म्हणजे ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’चा प्रकार ! |