झारखंड, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सहभाग

धनबाद (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सहभाग घेतला. या अंतर्गत ‘हलाल अर्थव्यवस्था : भारतविरोधी षड्यंत्र’ या विषयावर व्याख्याने आणि जनजागृती बैठकांचे आयोजन, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, आध्यात्मिक व्याख्याने, हिंदु राष्ट्र-जागृती बैठकांचे आयोजन आणि वैयक्तिक संपर्क करण्यात आले. कतरास येथील कार्यक्रमांना सनातनचे पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

हिंदु राष्ट्र-जागृती व्याख्यान

किड्स केअर, कतरास येथे मार्गदर्शन करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि पू. प्रदीप खेमका

समितीच्या वतीने कतरास परिसरातील ‘किड्स केअर’ आणि ‘सरस्वती शिशु मंदिर’ या शाळांमध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दैवी कार्यात साधनेची आवश्यकता’ आणि ‘हिंदु धर्माची वैशिष्ट्ये’ यांविषयी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सनातनचे पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

त्रिपुरामध्ये आध्यात्मिक व्याख्यानांचे आयोजन

त्रिपुरामध्ये शांती बाजार येथे रियांग जमातीचे श्री. बीरेंद्र रियांग यांनी त्यांच्या समुदायासाठी, तसेच शांती काली मिशनचे श्री. मनीसिंह कलाई यांनी आश्रम सदस्य आणि त्यांच्या शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शन आयोजित केले होते.

हिंदु राष्ट्र-जागृती बैठकांचे आयोजन

झारखंडमधील कतरास भागातील धर्माभिमानी पत्रकार, अधिवक्ते आणि उद्योगपती यांच्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन रांची येथील माहेश्वरी सभेने केले होते. या बैठकीच्या आयोजनासाठी माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्री. किशन साहू आणि श्री. शिवशंकर साहू यांनी विशेष प्रयत्न केले.

हलाल अर्थव्यवस्थेविषयी जनजागृती बैठकांचे आयोजन

अधिवक्ता राजीवकुमार नाथ यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे निमंत्रण देतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

अ. आसाममधील सिलचर भागातील शनि मंदिराचे विश्वस्त आणि अधिवक्ता राजीवकुमार नाथ, अधिवक्ता मृगंका भट्टाचार्य आणि वासुदेव शर्मा यांनी हलाल अर्थव्यवस्थेविषयी जनजागृती बैठकीचे आयोजन केले होते.

आ. अशाच प्रकारची एक बैठक बरनपूर येथे घेण्यात आली. या बैठकीला अधिवक्ता राजीवकुमार नाथ यांच्या परिचयातील धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

एका व्याख्यानात मार्गदर्शन करतांना पू. वृद्ध प्रभु आणि त्यांच्या बाजूला सद्गुरु नीलेश सिंगबाळ

इ. पू. वृद्ध प्रभूजी यांनी महाकाल सेना, भाजपचे कार्यकर्ते, भारतीय युवा मोर्चाचे सदस्य, तसेच पू. वृद्ध प्रभुजी यांचे भक्त यांच्यासाठी होजाई येथील त्यांच्या होजाई आश्रमामध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते.

ई. बंगाई येथे माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्यांसाठी अलका माहेश्वरी आणि मंडळाच्या अध्यक्षा प्रेमलता चांडक यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते.

उ. हिंदु संथाल संस्कृती रक्षा परिषद, कोकारजारचे सर्वश्री बाबू टुडू आणि जेठा हसदा यांनी त्यांच्या संघटनेचे सदस्य आणि बिरसा कमांडो फोर्स, कल्याण आश्रम, एकल विद्यालय, मारंग बोडो सेवा समितीचे सदस्य यांच्यासाठी एक बैठक आयोजित केली होती.

ऊ. मेघालयाच्या शिलाँग येथील विवेकानंद संघाच्या सदस्यांसमवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. चंद्रकांत रायपत यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे निमंत्रण देतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे निमंत्रण देतांना डावीकडून सद्गुरु नीलेश सिंगबाळ, मध्यभागी स्वामी चित्त महाराज आणि समितीचे श्री. शंभू गवारे
भारत सेवाश्रम संघाचे स्वामी साधनानंद महाराज यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे निमंत्रण देतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ
श्रीमती इस्टर खरबोमान यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे निमंत्रण देतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ
श्री. काबिंद्रनाथ शर्मा यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे निमंत्रण देतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियानात घेतलेल्या भेटी

हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियानाच्या अंतर्गत रांची येथील ‘एकल ग्रामोत्थान फाऊंडेशन’, ‘सेवा भारती’चे विश्वस्त तथा ‘विश्व हिंदु परिषदे’चे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, पू. वृद्ध प्रभू, सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रिया मुंडा, ‘तरुण हिंदु’चे संस्थापक डॉ. नील माधव दास, रामगड येथील ‘पांचजन्य’चे पत्रकार श्री. रितेश कश्यप, रांची येथील ‘सेवा भारती’चे श्री. गुरुशरण; ‘मोतीलाल नेहरू पब्लिक स्कूल, जमशेदपूर’चे डॉ. डी.पी. शुक्ला; ‘श्रीकृष्ण पब्लिक स्कूल, जमशेदपूर’चे श्री. आर्.सी.जी., आभूषण ज्वेलर्सचे श्री. अनिल सिंघानिया, आगरतळाचे (त्रिपुरा) हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सौमेंद्र चक्रबर्ती, देबज्योती दत्तगुप्ता, प्रशांत कुमार, अधिवक्त्या मधुमिता चौधरी, अधिवक्त्या सामंता चक्रबर्ती; ‘त्रिपुरसुंदरीदेवी देवस्थान, उदयपूर’चे श्री. सुप्तम देबनाथ, ‘शांती काली आश्रम, अमरपूर’चे स्वामी चित्त महाराज आणि श्री. गया मणि, ‘भारत सेवाश्रम संघा’चे पूर्वोत्तर भारतचे मुख्य संयोजक स्वामी साधनानंद महाराज, आगरतळाचे स्वामी नारायण महाराज, शिलाँग (मेघालय) येथील स्वामी पूर्णब्रतानंद महाराज, हिंदु रक्षा दलचे श्री. पार्थो प्रतिम देबनाथ, सिलचर (आसाम) येथील अधिवक्ता राजीवकुमार नाथ, अधिवक्ता मृगंका भट्टाचार्य, श्री. अमृतेश कुमार, शिलाँग येथील श्रीमती ईस्टर खरबोमान, श्री. केथ परीआत, ‘बिहारी वेलफेयर संघा’चे श्री. शत्रुघ्न प्रसाद, ‘केंद्रीय पूजा समिती’चे अध्यक्ष श्री. नब भट्टाचार्य, श्री. जे. एल्. दास, गुवाहाटी येथील ‘श्री कामाख्यादेवी मंदिरा’चे मुख्य दलोई श्री. काबिंद्रनाथ शर्मा, ‘ऑल असम देवालय संघा’चे अध्यक्ष श्री. सुरेशचंद्र भट्टाचार्य, अधिवक्ता कमलेशकुमार गुप्ता, ‘सोशल मिडिया’ कार्यकर्ते श्री. जनपीस कौशिक, ‘माहेश्वरी सभे’चे श्री. कैलाश काबरा, होजाई (आसाम) येथील महाकाल सेनेचे सर्वश्री मिथुन राय, बिजीत भट्टाचार्य असे सर्व हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि संत यांची भेट घेण्यात आली. तसेच या सर्वांना समितीच्या कार्याची माहिती सांगण्यात आली. गोवा येथे जून मासात होणार्‍या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’विषयीची माहिती सांगून संतांकडून त्यासाठी आशीर्वाद घेण्यात आले.