(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहांची तोडफोड करू !’ – काँग्रेसचे झारखंडमधील आमदार इरफान अंसारीची धमकी

काँग्रसचे झारखंडमधील आमदार इरफान अंसारी

रांची (झारखंड) – ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवल्यास त्या चित्रपटगृहाची तोडफोड करण्यात येईल, अशी धमकी झारखंडमधील काँग्रसचे आमदार इरफान अंसारी यांनी दिली आहे. ‘हा चित्रपट प्रदर्शित करणार्‍या चित्रपटगृहांच्या मालकांच्या विरोधात खटला प्रविष्ट केला जाईल’, असे अंसारी यांनी म्हटले आहे. अंसारी यांनी बजरंग दलाला ‘खुनी’ म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (भारतात झालेली शीखविरोधी दंगलीला काँग्रेस उत्तरदायी होती. त्याविषयी अंसारी यांनी बोलावे ! – संपादक)

आमदार इरफान अंसारी यांनी म्हटले आहे की

१. ‘द केरल स्टोरी’च्या कथेमध्ये काही अर्थ नाही. धर्मांमध्ये फूट पाडणारा आणि लोकांचा अपमान करणारा हा चित्रपट आहे. (जिहादी आतंकवादाचे सत्य चित्रण करणार्‍या या चित्रपटामुळे जिहादी मानसिकेतेच्या अंसारीसारख्या काँग्रेसवाल्यांचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे ! – संपादक)

२. बजरंग दलाला राज्यात कायदा हातात घेऊ देणार नाही. बजरंग दलाचे कार्यकर्ते लोकांना मारहाण करतात. जमावाकडून हत्या करण्याचे प्रकार ही बजरंग दलाची देणगी आहे. हे लोक मुक्तपणे फिरत आहेत. या मारेकर्‍यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. येथे आमचे सरकार आहे’’, अशी धमकी अंसारी यांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचे युती सरकार आहे. त्यामुळे कायदा हातात घेण्याची भाषा करणार्‍या अशा धर्मांध आमदारावर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे ! 
  • अहिंसेचे पुजारी असणार्‍या काँग्रेसवाल्यांचे खरे स्वरूप ! असा पक्ष सत्तेत असतांना झारखंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखली जाणार ?