राहुल गांधी यांच्या उपस्थितीतील विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांची भूमिका !
नवी देहली – स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा.स्व. संघ यांच्यामध्ये कोणताही संबंध नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणेही योग्य नाही. आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाची सूत्रे आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे आयोजित विरोधी पक्षांच्या बैठकीत मांडली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी ‘शरद पवार यांच्या मताचा मी आदर करतो’, असे या वेळी म्हटले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही शरद पवार यांच्या मताचा ते आदर करत असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्या या मताला मित्रपक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे.
सौजन्य: TV9 Marathi
काँग्रेसने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी रात्रीचे भोजन आयोजित केले होते. तत्पूर्वी ही बैठक झाली. राहुल गांधी पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले. या वेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि तृणमूल काँग्रेस यांचे नेते उपस्थित नव्हते.
संपादकीय भूमिका
|