१. चीनमधील कोरोना महामारीची स्थिती नियंत्रणाच्या बाहेर !
चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये (समभाग विक्री बाजारामध्ये) सध्या अंत्यविधी व्यवस्थापन करणार्या आस्थापनांचे शेअर्सचे भाव वधारले आहेत. ही आस्थापने पहिल्या १० आस्थापनांच्या सूचीमध्ये आहेत. यावरून चीनमध्ये कोरोना महामारीच्या लाटेचे गांभीर्य लक्षात येते. चीन कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असला, तरी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियंत्रणाच्या बाहेर परिस्थिती गेली आहे, हे खरे आहे.
२. पाकिस्तानची दयनीय आर्थिक स्थिती
पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती २००, तर गॅस सिलिंडरच्या १० सहस्र रुपये पार झाली आहे. पाक श्रीलंकेच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी उघडपणे मान्य केले आहे, ‘‘अमेरिकेच्या दबावाला न झुकता भारताने राजनैतिक शहाणपण दाखवत रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतले, तसे धाडस पाकने दाखवायला हवे होते.’’
३. किती बांगलादेशी पर्यटक भारतातून परत जातात ? याची आकडेवारी प्रसिद्ध करा !
भारतात प्रतिवर्षी सर्वाधिक पर्यटक बांगलादेशातून येतात. देशात येणार्या एकूण पर्यटकांच्या साधारणतः २५ टक्के ही संख्या आहे. अनुमाने २० ते २५ लाख पर्यटक व्हिसा घेऊन भारतात येतात; पण प्रश्न असा आहे की, यातील किती परत जातात ? खरेतर याचाही अभ्यास होऊन ती आकडेवारी प्रसिद्ध करायला हवी !
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय धोरणांचे विश्लेषक