अतिक्रमणकर्त्यांनी १०० टक्के बळकावलेला माहीम गड !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे. ६ जानेवारी या दिवशी आपण ‘शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ !’, याविषयीचा लेख वाचला. आज अतिक्रमणकर्त्यांनी बळकावलेला माहीम गड याविषयीची माहिती देत आहोत.

(भाग ६)

(भाग ५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/642588.html)

मुंबईतील ‘माहीम गड’

मुंबईतील माहीम गडाच्या प्रवेशद्वारावर राज्य पुरातत्व विभागाचा फलक केवळ नावालाच लावलेला आहे. हा संपूर्ण गडच अतिक्रमण करणार्‍यांनी १०० टक्के बळकावला आहे. गडावर अतिक्रमण करणार्‍यांमध्ये ९५ टक्के मुसलमान, तर ५ टक्के हिंदू आहेत. या गडाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.

माहीम गडावर असलेली अवैध वस्ती
लोखंडी सळ्यांद्वारे बंद करण्यात आलेले गडाचे प्रवेशद्वार

गडाच्या प्रवेशद्वारावर चक्क लोखंडी सळ्यांची चौकट बसवून या गडाचे प्रवेशद्वारच बंद करण्यात आले आहे. प्रवेशद्वारापासून गडावर अनेकांनी संसार थाटला आहे. गडाचा मागचा भाग हा जुगारी आणि मद्यपी यांचा अड्डा झाला आहे. दिवसाढवळ्या गडाच्या मागील भागात मद्यपींचा वावर असतो.

(भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/643450.html)