वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे.

(भाग ७)

(भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/642936.html)

पहाडेश्वर पर्वत, ठाणे

ठाणे जिल्ह्यात ताहुली येथे मलंगगडाच्या बाजूला पहाडेश्वर नावाचा अतीउंच पर्वत आहे. हा पर्वत इतका अवघड आहे की, पर्वतावर चालत जायचे झाले, तर तब्बल ५ घंटे लागतात. वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या या पर्वतावर मुसलमानांनी अनधिकृतपणे ११ थडगी बांधली आहेत. केवळ थडगी बांधून न थांबता त्यांच्यावर चादर चढवण्यात आली आहे, तसेच सर्व थडग्यांच्या भोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.

पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आलेली अवैध थडगी

स्थानिक मुसलमानांनी पहाडेश्वर पर्वताचे नामकरणही ‘दादी माँ पर्वत’ असे, तर त्याच्या बाजूला असलेल्या कार्तिक-गणेश पर्वताचे नामकरण ‘पाच पीर पर्वत’ असे केले आहे. या पर्वतावर २ लोखंडी पाईप पक्क्या बांधकामात उभे करून पर्वतावर हिरवे निशाण फडकवण्यात आले आहे.

पर्वतावर पक्क्या बांधकामात लोखंडी पाईप उभा करून त्यावर लावलेले हिरवे निशाण

पहाडेश्वर पर्वताच्या या अतीउंच सुळक्यावर जनरेटर आणि ध्वनीक्षेपक नेऊन तेथे नमाज अदा केली जात आहे. काही मुसलमान कुटुंबेही अनधिकृत बसवण्यात आली आहेत. अतीउंच असल्यामुळे दुर्लक्षित असल्याचा अपलाभ घेऊन हा पर्वत बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे. वनविभागाने यावर वेळीच कारवाई न केल्यास काही वर्षांत या पर्वतावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.

(भाग ८. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/643758.html)