दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !
गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे. ५ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.
(भाग ५)
(भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/642301.html)

मुंबईतील शिवडी दुर्गाच्या प्रवेशद्वारावर ‘दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह’ या नावाने दर्गा बांधला असून गडाच्या १ एकर भूमीत या दर्ग्याचा अवैधपणे विस्तार करण्यात आला आहे.

दर्ग्याच्या देखभालीसाठी येथे एक मुसलमान कुटुंबही वसवण्यात आले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय म्हणून तेथे बकर्या पाळण्यात आल्या आहेत. दर्ग्याच्या भोवती हिरवे ध्वज लावले आहेत. त्यामुळे हा गड म्हणजे मुसलमानांचे धार्मिक स्थान असल्याप्रमाणे वाटत आहे. या दर्ग्यावर जाण्यासाठी स्वतंत्र पाकाडी मार्ग सिद्ध करण्यात आला आहे. या गडाच्या बाहेर पुरातत्व विभागाचा फलक छोटा आहे; मात्र दर्ग्यासाठी स्वतंत्र कमान उभारण्यात आली आहे.

ऐतिहासिक स्थानाऐवजी या गडावर मुसलमानांचे धार्मिक स्थळ म्हणून शिवडी गडावरील प्रस्थ वाढवण्यात येत आहे.
(भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/642936.html)
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !