दत्ताच्या निर्गुण तत्त्वाच्या पादुकांचे महत्त्व !

‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात अन् त्यांचीच पूजा मंदिरात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो. पादुकांतील निर्गुण तत्त्वामुळे साधकाचे मन, चित्त, बुद्धी आणि अहं या सूक्ष्म-देहांची शुद्धी होते. त्यामुळे दत्तभक्त दत्ताच्या सगुण रूपासमवेतच निर्गुण रूपाशी, म्हणजेच दत्ततत्त्वाशी लवकर एकरूप होतो.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२००५)