घाटकोपर ‘प्रेसिडेन्शियल टॉवर’ येथे ७ डिसेंबर या दिवशी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन

मुंबई – घाटकोपर (पश्चिम) येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील प्रेसिडेन्शियल टॉवर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी ७ डिसेंबर या दिवशी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत.

सकाळी ७ ते ९ या वेळेत नित्यपूजा, सकाळी ९ ते दुपारी ३ श्री दत्त याग (हवन), दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री सत्यनारायणपूजा, सायंकाळी ५ ते ६ श्री दत्तजन्म, महाआरती, सायंकाळी ६ ते रात्री १० दर्शन आणि तीर्थ-प्रसाद सायंकाळी ७ ते रात्री १०, रात्री ९ ते ११ या वेळेत महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविकांनी दत्त दर्शनाचा आणि या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गुरुवर्य श्री. गोपाळ बसणकर यांनी केले आहे.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन !

या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात येणार आहे. या ठिकाणी  साधना, अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील महत्त्वाचे ग्रंथ उपलब्ध असणार आहेत. या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.