धुळे शहरातील ३ सहस्र ३०० हिंदु कुटुंबांच्या भूमीवर वक्फ बोर्डाने सांगितला हक्क !

‘वक्फ बोर्डा’चा ‘लँड’ (भूमी) जिहाद !

धुळे – शहरातील नटराज टॉकीज परिसरातील दत्तवाडी, पारोळा रोड, मनमाड जीन, काजी प्लॉट, नित्यानंदनगर, लक्ष्मीनगर आणि लोकमान्यनगर या परिसरात ३ सहस्र ३०० हिंदु कुटुंबे गेल्या ६० वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. तेथील भूमी काजी यांच्याकडून ९९ वर्षे करारावर घेण्यात आली होती. याची मर्यादा वर्ष २०६६ पर्यंत आहे; मात्र या जागेवर आता ‘वक्फ बोर्डा’ने हक्क सांगितला आहे. वक्फ बोर्डाच्या या दाव्यामुळे या भागातील रहिवाशांना खरेदी विक्री, बँक, तसेच महानगरपालिका या विभागातील कोणत्याही प्रकारचा ‘ना हरकत दाखला’ मिळत नाही.

सौजन्य नागपूर समय मीडिया 

‘वक्फ बोर्ड हटाव संघर्ष समिती’च्या आंदोलनात वक्फ कायदा रहित करण्याची मागणी !

अन्य एका प्रकरणात मुसलमानांनी जिल्ह्यातील लळींग गावालगत असलेल्या टेकडीवर दर्गा उभारून ती संपूर्ण टेकडी वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित केली आहे. या विरोधात ‘वक्फ बोर्ड हटाव संघर्ष समिती’च्या वतीने जेलरोड परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी वक्फ कायदा तात्काळ रहित करण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले.

‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जगातील मुसलमान देशांत हा कायदा नसून केवळ भारतातच तो का ?’, असा प्रश्‍न या रहिवाशांनी विचारला आहे. या आंदोलनात खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्वे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनो, तुमची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित होण्यासाठी आतातरी प्रयत्न करा !
  • हिंदु कुटुंबांच्या भूमीवर कायद्याचा बडगा उगारला जाण्यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ?