गुढीपाडवा असे हिंदूंचा नववर्षारंभ ।
तोच असे जगाचा प्रारंभ ।।
हिंदूंनो, पाश्चात्त्य ‘३१ डिसेंबर’ला नसे काही आधार ।
अनुसरूया भारतीय संस्कृती; अन्यथा व्हाल निराधार ।।
गुढ्या, तोरणे, पताका देतात नववर्षाची नांदी ।
मद्य, मेजवान्या, दंगा-मस्ती यांनी होते केवळ सुंदोपसुंदी ।।
करूया एकमुखाने सिंहगर्जना ।
पाळणार केवळ नववर्ष गुढीपाडव्याला, करू संकल्प अन् योजना ।।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, पनवेल (१६.३.२०२२)