रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील ! – अमेरिका

डावीकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर त्याचे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना चेतावणी दिली. बायडेन यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. रशियाने युक्रेनवरील आक्रमणाविषयी कोणतीही माहिती उघड केली नसली, तरी युक्रेनमध्ये अमेरिकेचे भूसैनिक पाठवले जाण्याची शक्यताही बायडेन यांनी वर्तवली.