सावंतवाडी – जिल्ह्यात दहीहंडी उत्सव यावर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव साजरे करण्यात आले. ३० ऑगस्टला रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तर ३१ ऑगस्टला श्री शिवराजेश्वर मंदिरासमोर मानाची दहीहंडी बांधून ती देवस्थानचे पुजारी सयाजी सकपाळ यांनी पारंपरिक पद्धतीने फोडली. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराकडून श्री शिवराजेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे
१ मानाची दहीहंडी पाठवली होती. सावंतवाडी येथे राज्यशासनाचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने शहरातील केशवसूत कट्टा परिसरात प्रतिकात्मक स्वरूपात दहीहंडी फोडण्यात आली.