बेधडकपणे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई का केली नाही ? अशाप्रकारच्या निर्णयातून प्रशासन लोकांना काय संदेश देत आहे. सामान्यांसाठी एक नियम आणि लोकप्रतिनिधींसाठी वेगळा असे समजायचे का ?
संभाजीनगर – येथील खुलताबाद परिसरात ३ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांचे व्यासपिठावर आगमन होताच तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर नोटांची उधळण केली. काही लोक जलील यांना खाद्यांवर घेऊन नाच करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. यामध्ये एकाही व्यक्तीने ‘मास्क’ घातलेला नव्हता, सामाजिक अंतर ठेवणे आणि इतर कोरोना नियमांचे कोणतेही पालन केलेले नव्हते.
MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोना नियमांची पायमल्ली pic.twitter.com/4McNvetMjY
— News18Lokmat (@News18lokmat) July 4, 2021
शहरात सध्या ‘विकेंड दळणवळण बंदी’ची घोषणा करण्यात आलेली असतांनाही रात्री १२ वाजेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमाला शेकडो लोकांची गर्दी होती.