हिंदूंच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट रचणार्‍या पी.एफ्.आय.च्या दोघा आतंकवाद्यांना अटक

मागील अनेक घटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिहाद्यांनी अनेक समाजविघातक कारवाया केल्याचे उघड झाले असतांना केंद्र सरकारने अद्याप तिच्यावर बंदी न घालणे हिंदूंना अपेक्षित नाही !

अटक करण्यात आलेले आतंकवादी आणि जप्त केलेली स्फोटके

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) अनसद आणि फिरोज या दोघा आतंकवाद्यांना अटक केली. येथील गुडम्बा येथून त्यांना अटक करण्यात आली. फिरोज हा केरळ येथील आहे. या दोघांनी देशातील काही भागांमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला होता. वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी या दिवशी ते बॉम्बस्फोट करण्याच्या प्रयत्नात होते. तसेच हिंदूंच्या नेत्यांना लक्ष्य करण्याच्याही ते प्रयत्नात होते. त्यांच्याकडून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, १८ फेब्रुवारी या दिवशी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा स्थापना दिवस आहे. त्यादिवशी हे घातपात करणार होते. याचे कार्यकर्ते लहान लहान गट बनवत आहेत. त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देऊन त्यांना सिद्ध करत आहेत. गेल्या वर्षभरात पी.एफ्.आय.च्या १२३ जणांना अटक करण्यात आली आहे.