पाकने रा.स्व. संघावर बंदी घालण्याची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केल्याचा पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

संयुक्त राष्ट्रांकडे अशा प्रकारची मागणी करण्यात आली नसल्याचे उघड

  • यातून पाकचा आणि त्यांच्या प्रसारमाध्यमांचा खोटारडेपणा परत परत उघड होत आहे  !
  • संघावर बंदी घालण्याचा विचार करण्यापेक्षा पाकला विनाशाकडे घेऊन जाणार्‍या आतंकवादी संघटनांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर पाकने बंदी घालून त्यांच्या देशाला वाचवावे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त राष्ट्रांतील पाकचे स्थायी प्रतिनिधी मनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केल्याचे वृत्ता पाकमधील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

 (सौजन्य : Kaumudy English)

अक्रम यांनी म्हटले आहे की, ‘हिंदुत्व आणि जागतिक शांतता यांसाठी संघ धोकादायक आहे.’ याविषयी माहिती घेण्यात आली असता पाकच्या राजदूतांकडून संयुक्त राष्ट्रांकडे अशा प्रकारची कोणतीही लेखी मागणी करण्यात आली नसल्याचे समजले आहे.