बांगलादेशींच्या घुसखोरीचे परिणाम
आज आसाम आणि त्रिपुरा यांच्या एकूण १३ जिल्ह्यांमध्ये बांगलादेशींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झालेली आहे. हिंदु महिलांवर बलात्कार करणे, त्यांना पळवून नेणे आणि अवैध व्यापार करणे इत्यादी घटना या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक आठवड्याला होत आहेत. तिरंगा जाळणे, राष्ट्रीय सणांच्या वेळी दहशतीचे वातावरण पसरवणे असेही तेथे घडते. घरफोड्या आणि चोर्या करणे आदींचे पेव फुटलेले दिसते. एकूणच या परिस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येणे, हा पहिला, तर देशातील कामगारांच्या पोटावर पडणारा पाय हा दुसरा परिणाम ! त्यांच्यापेक्षा भयावह परिणाम म्हणजे स्वस्त दरात काम करणार्या बांगलादेशींना जेव्हा येथील व्यापारी आणि कंत्राटदार जवळ करतात, तेव्हा भारतीय कामगार मात्र बेकारी अन् उपासमारी यांच्या संकटात सापडतो. देशात घुसून बसलेल्या अनुमाने ४ कोटींच्या आसपास असलेल्या बांगलादेशींचा देशावर पडणारा आर्थिक बोजा हा आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे. त्याची गंभीर नोंद घेणे निकडीचे आहे. (यावरून बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (‘एन्.आर्.सी.’ची) प्रक्रिया किती आवश्यक आहे, ते दिसून येते. त्याचसमवेत ही प्रक्रिया प्रभावीपणे आणि कठोरपणे कार्यवाहीत आणलीे, तरच देशाचे रक्षण होऊ शकेल. – संपादक)
(संदर्भ : ‘मुंबई तरुण भारत’, दिवाळी २०१२)