गोव्यात पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा विद्यालयांना आदेश

पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. शिक्षण संचालनालयाने या आदेशात पुढे म्हटले आहे की, पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांच्या अंतिम परीक्षांचा निकाल ८ मे २०२१ किंवा त्यांनर घोषित करावा. पहिली ते नववी इयत्तांची सहामाही परीक्षा १५ जानेवारी २०२१ पर्यंत आणि वार्षिक परीक्षा एप्रिल २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात घ्यावी.