कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद !

नवी देहली – कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद असल्याचे घोषित करण्यात आले होते; मात्र या कालावधीत ‘वन्दे भारत मिशन’च्या अंतर्गत चालू असलेल्या विशेष विमानांना उड्डाणाची अनुमती असणार आहे. तसेच अनुमती मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल. कोरोनामुळे २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.