अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी ४ जण कह्यात

समाजाची नैतिकता ढासळत चालली असल्याचेच हे द्योतक असून अशा घटना टाळण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

नारायणगाव (जिल्हा पुणे ) – खोडद (तालुका जुन्नर) येथील २ अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी ४ जणांना कह्यात घेतले असून जुन्नर न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कलम अंतर्गत (पोक्सो) गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के. गुंड यांनी दिली. गुंड यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्‍लेषण केले. मोखाडा (जिल्हा पालघर) येथील दुर्गम भागातून मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले, तर आरोपींना कह्यात घेतले