माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाच्या नोटीसीला २१ दिवसात उत्तर द्यावे लागेल !

सातारा, २० नोव्हेंबर (वार्ता.) – गेल्या १० वर्षांत तुमचे उत्पन्न कसे वाढले ?, निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली माहिती योग्य आहे का ?, याची विचारणा आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे. या विषयीची माहिती २१ दिवसांत आयकर विभागाला द्यावी लागणार आहे, असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या नोटीसीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांना चौकशीच्या फेर्‍यांत अडकवण्याचा प्रयत्न आहे. मी माझ्या नोटीसीला योग्य ते उत्तर देणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांना फार पूर्वीच चौकशीच्या नोटिसा दिल्या आहेत. माझा नंबर महाराष्ट्रात पहिला लागला एवढेच काय ते विशेष ! याविषयी योग्य स्तरावरील सर्व माहिती संबंधित यंत्रणेला लवकरच देणार आहे.