पुढच्या ७ पिढ्यांचा विचार करून महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणावी !  – सत्यजित तांबे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस

फटाक्यांच्या विक्रीतून मिळणार्‍या महसुलाऐवजी फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, अपघात आणि अनावश्यक व्यय यांचा विचार करून केंद्रशासनाने संपूर्ण देशात फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा निर्णय त्वरित घ्यावा !

‘दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली असेल, याची मला कल्पना आहे. पुढील ७ पिढ्यांचा विचार करता आता आपली थोडी हानी झाली तरी चालेल; पण पुढच्या पिढ्यांसाठी फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून केली आहे.’