हिंदूंनो, ‘योग्य धर्मशिक्षण मिळून धर्माचरण केल्यास तुमच्याकडे वक्रदृष्टी करून पहाण्यास कुणी धजावणार नाही’, हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करा !

हिंदू धर्मानुसार सात्विक कपडे

१. प्रवास करतांनाही पारंपरिक वेश परिधान करणारे अन्य पंथीय आणि पाश्‍चिमात्त्य वेश परिधान केलेले हिंदू

‘एके दिवशी मी आगगाडीने प्रवास करत होतो. आगगाडीतील डब्यात २ पारशी कुटुंबे होती. अन्य प्रवाशांच्या तुलनेत त्यांच्या संदर्भात मला जाणवलेला भेद म्हणजे, ही पारशी कुटुंबे त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत होती, तर इतर बरेच हिंदू प्रवासी नेहमीप्रमाणे जीन्स, टी-शर्ट इत्यादी वेशात होते. बर्‍याच हिंदू स्त्रिया आणि युवती यांनी पाश्‍चिमात्त्य वेश परिधान केलेला होता. काहींनी नेहमीप्रमाणे अंगप्रदर्शन करणारी ‘मॉडर्न’ वस्त्रे परिधान केलेली होती.

२. हिंदूंमध्ये संस्कृतीचा अभिमान नसल्याने तो त्यांच्यात रुजवण्यासाठी धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता असणे

हे सर्व पहातांना माझ्या लक्षात आले की, मुसलमान, पारशी इत्यादी पंथियांनी त्यांची संस्कृती जपण्याचा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे आणि करतही आहेत. याउलट हिंदू मात्र त्यांच्या संस्कृतीपासून दूर चालले आहेत. याचे मूळ कारण केवळ एकच आहे आणि ते म्हणजे, हिंदूंना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान राहिलेला नाही. हा अभिमान रुजवण्यासाठी आवश्यक असणारे धर्मशिक्षण देणारे कुणी नाही. त्यामुळे हिंदूंचे धर्माचरण बहुतांशी ‘फॅशन’ आणि अत्यल्प अंशी उंबरठ्याच्या आतच राहिले आहे. ‘हिंदूंना योग्य धर्मशिक्षण मिळून त्यांच्याकडून धर्माचरण झाल्यास त्यांच्याकडे वक्रदृष्टी करून पहाण्यास कुणी धजावणार नाही’, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

रसातळाला जाणार्‍या हिंदु समाजाला धर्मशिक्षण देण्यासाठी धर्माभिमानी आणि साधक यांनी संत अन् देवता यांच्या चरणी शरणागत होऊन प्रयत्नांना भावाच्या स्तरावर गती देणे, ही काळाची आवश्यकता आहे.’

– एक धर्माभिमानी