निधन वार्ता 

निपाणी (जिल्हा बेळगाव) – निपाणी येथील उद्योजक, समाजसेवक, तसेच  सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र-धर्म कार्यात साहाय्य करणारे हितचिंतक श्री. प्रवीणभाई पोपटलाल शहा यांच्या पत्नी सौ. अनुपमाबेन प्रवीण शहा (वय ६९ वर्षे) यांचे २१ सप्टेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, २ मुले, २ सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार शहा परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.