हिंदूंना अंतिम संदेश : कोणत्याही किमतीत ध्येय साध्य करा !

आज रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

पू. गोळवलकरगुरुजी

आज आपल्या देशात विघटनकारी शक्ती कार्यरत आहेत आणि परदेशातील काही संस्था, संघटना या गोंधळाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक वर्षांपूर्वी आसाम भाषेच्या संघर्षात विदेशी शक्तींचा सहभाग होता. हरिजन अत्याचाराविषयी दिशाभूल करणार्‍या बातम्या पसरवण्यामागे परकीय प्रभाव असल्याचे आता दिसून येत आहे. भारतात स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्याचा एकमेव मार्ग, म्हणजे हिंदूंमध्ये फूट पाडणे, हे परकीय शक्तींना समजते. आपण हे मान्य केले पाहिजे की, समाजाला एकत्र आणण्यात आणि त्यात देशभक्तीची तीव्र भावना जागृत करण्यासाठी आपण तितके प्रभावी विचार करू शकलो नाही. परिणामी आपण आपल्या दायित्वांविषयी अधिक जागरूक असले पाहिजे, आपल्या कामाच्या सर्व घटकांचा विचार केला पाहिजे आणि नजीकच्या भविष्यात स्वतःला पूर्णपणे नियंत्रणात ठेवले पाहिजे अन् कोणत्याही किमतीवर ध्येय साध्य करण्याचा निर्धार केला पाहिजे !

– प.पू. गोळवलकरगुरुजी

संकलक : पंकज जयस्वाल

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ६.३.२०२४)