विद्युत् आस्थापनांच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रहित

मुंबई – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणाशीही चर्चा न करता विद्युत् आस्थापनांवर अशासकीय व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार गेल्यावर राऊत यांनी या नियुक्त्या रहित केल्या आहेत. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डिंग आस्थापनांवरील १६ सदस्यांचा समावेश होता.