शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार १ मासाचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देणार ! – खासदार संजय राऊत

मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू’, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही त्यांचे १ मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दिले आहे.