पाकमध्ये व्यवस्थापन यंत्रणेअभावी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

पाककडे जिहादी आतंकवादी बनवण्याच्या व्यतिरिक्त काहीही बनवण्याची बुद्धी, शक्ती आणि पैसे नाहीत, हेच सत्य आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – इराणमध्ये गेलेले पाकिस्तानी यात्रेकरू पाकमध्ये परतत आहेत. पैशांच्या चणचणीमुळे या यात्रेकरूंना आम्ही कोणतीही सुविधा पुरवू शकलेलो नाही. आमच्याकडे कोणतीही व्यवस्थापन यंत्रणा नाही. परिणामी पाकमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, अशी स्वीकृती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. इराणमध्ये गेलेल्या पाकिस्तानी यात्रेकरूंना कोरोनाची लागण झाली आहे. पाकमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १ सहस्र ४०८ हून अधिक झाली असून कोरोनामुळे एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘आता आम्ही युवकांचा एक गट बनवत असून तो घरोघरी जाऊन लोकांना खाण्याच्या वस्तू पोचवील’, असेही खान यांनी सांगितले.