अमेरिका मित्रराष्ट्रांनाही ‘व्हेंटिलेटर्स’चा पुरवठा करणार ! – डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका मोठ्या प्रमाणावर ‘व्हेंटिलेटर्स’ बनवणार आहे. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करूच, तसेच कोरोनाच्या विरोधातील लढ्यामध्ये आमच्या मित्रराष्ट्रांनाही आवश्यकतेप्रमाणे ‘व्हेंटिलेटर्स’चा पुरवठा करू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेने पुढील १०० दिवसांत १ लाखांहून अधिक ‘व्हेंटिलेटर्स’चे उत्पादन करण्याचे ध्येय समोर ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.