भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सद्यःस्थिती पहाता आपत्काळ अगदी दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच (महिनेच) राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

आपत्काळाच्या दृष्टीने मानसिक स्तरावर करायची सिद्धता

काही समस्यांच्या संदर्भात मनाला स्वयंसूचना द्याव्यात !

स्वयंसूचनांविषयीचे सविस्तर विवरण सनातनचा ग्रंथ ‘स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन’ यात केले आहे. दंगल, भूकंप, महायुद्ध आदींच्या वेळी उद्भवणार्‍या स्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास संबंधित प्रसंगांचा सराव करण्यासाठी स्वयंसूचना द्यावी ! ‘आपत्काळातील एखाद्या प्रसंगात काहीच करणे आपल्या हातात नसेल, तर त्या कठीण प्रसंगाकडे तत्त्वज्ञाच्या भूमिकेत राहून किंवा साक्षीभावाने पहाता यावे आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारता यावी’, यासाठी स्वयंसूचना द्यावी ! अल्प-अधिक कालावधीसाठी कुटुंबियांचा वियोग सहन करण्याची सिद्धता ठेवावी !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता’)