अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था ।

२६ मार्च २०२० या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन आहे. त्यानिमित्ताने …

श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटीश: प्रणाम !

श्री. सुधाकर जोशी

अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था, गातो तुझीच रे गाथा ।
हात जोडूनी तुझ्याच चरणी, ठेवितो मी माथा ॥ १ ॥

तुझ्याच कृपेने आलो मी या तीर्थक्षेत्रासी (टीप) ।
तूच माझा सखा अन् तूच रे सोबती ॥ २ ॥

तुझीच मूर्ती समोर दिसता । माता, पिता तूच ज्येष्ठ भ्राता ॥ ३ ॥

तुझीच घडावी नित्य सेवा । हेच आहे मागणे देवा ॥ ४ ॥

नाम तुझे रे नित्य मुखी असावे । जन्माचे सार्थक रे व्हावे ॥ ५ ॥

तुझीच भक्ती करोनी नर-नारी । तूच आहेस देवा, दत्तावतारी ॥ ६ ॥

टीप – सनातन आश्रम

– श्री. सुधाकर केशव जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(१०.१.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक