परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना  करून सूक्ष्मातील कळायला लागले की,  यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’-  (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी संत आणि श्रीकृष्ण यांचे पाद्यपूजन करवून बगलामुखी याग करवून घेणे 

सकाळी ६ वाजता मी नामजप करतांना प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसले. ‘पुष्कळ दिवसांनी आज प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आले आहेत’, हे पाहून माझे मन आनंदी झाले. मी त्यांची पाद्यपूजा केली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गरुड यागाच्या वेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती

गरुडदेवतेने आश्रमाभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर प्रचंड मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. या वेळी भारतातील आणि भारताच्या बाहेरील सर्वत्रच्या साधकांना त्रास देणारे सर्पास्त्र अन् काल सर्प यांचा नाश केल्याचे जाणवले.

रामनाथी आश्रमात ऋषीयाग असतांना एका गायीने चाटणे, ही अनुभूती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी हे मोठे भाग्य असते, असे सांगणे

गोलोकातून आशीर्वाद मिळावा; म्हणून करण्यात आलेल्या ऋषीयागाच्या वेळी साहित्य बाहेर काढतांना अकस्मात एक काळ्या रंगाची गाय आली आणि चाटू लागली.