परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ.चे पू. देयान ग्लेश्चिच यांना श्री सरस्वतीदेवीकडून ज्ञानयोगाविषयी मिळालेले ज्ञान

१. रामनाथी आश्रमात झालेल्या एका देवीच्या यज्ञाच्या वेळी सूक्ष्मातून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन होणे आणि देवी तिच्या हातातील वेद देऊ लागल्यावर ‘मला केवळ ज्ञान ग्रहण करण्याचे माध्यम व्हायचे आहे’, असे देवीला सांगणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका देवीचा यज्ञ करण्यात येत होता. त्या वेळी मी तेथे उपस्थित होतो. तेव्हा मला सूक्ष्मातून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन झाले. माझ्या मनात तिच्याप्रती भक्तीभाव जागृत होऊन मी तिच्या चरणी नतमस्तक झालो आणि तिला शरण जाऊन तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सरस्वतीदेवीने तिच्या हातातील वेद मला देण्यासाठी तिचा हात पुढे केला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ईश्वरी ज्ञान मी कसे घेऊ शकतो ? हे ज्ञान माझे नाही आणि मी ते स्वतःचे म्हणून घेऊ शकत नाही.’ मी देवीला नम्रपणे सांगितले, ‘ज्या ज्ञानाची तू स्वतः अधिकारी आहेस, ते ज्ञान घेण्याचे धाडस मी करू शकत नाही. मला केवळ (ज्ञान ग्रहण करण्याचे) माध्यम व्हायचे आहे, म्हणजे केवळ ‘जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा तू देत असलेले ज्ञान माझ्या माध्यमातून प्रवाहित व्हावे’, अशीच माझी इच्छा आहे.’

२. या अनुभूतीनंतर ज्ञानयोगाविषयी मिळालेले ज्ञान

पू. देयान ग्लेश्‍चिच

अ. पूर्वी मला ‘ज्ञान मिळवणे म्हणजे ज्ञानयोग असून ‘मला ज्ञान मिळावे’, असे वाटत होते. ‘मला ज्ञान मिळावे’, असे वाटणे’, हा अहंकारच आहे’, हे माझ्या लक्षात आले. ज्याप्रमाणे सागर एका पेल्यात मावू शकत नाही, तसे मानवी मेंदूमध्ये ईश्वरी ज्ञान मावणे अशक्यच आहे.  ते ज्ञान मानवाच्या बुद्धीत मावणेही अशक्य आहे; कारण ईश्वरी ज्ञान बुद्धीच्या पलीकडचे असते.

आ. ‘मला ज्ञान नाही. मी अज्ञानी आहे आणि ईश्वर सर्वज्ञ आहे’, याची अनुभूती घेणे’, म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानमार्ग होय’, हा विरोधाभास माझ्या लक्षात आला.

इ. ‘ईश्वर सर्वज्ञ आहे’, हे अनुभवतांना आपल्याला जी समज येते, ती विश्वबुद्धीतून येते आणि आपल्या माध्यमातून ती प्रवाहित होऊन आपण ईश्वरी ज्ञान ग्रहण करू शकतो.

– श्री सरस्वतीदेवीने दिलेले ज्ञान (पू. देयान ग्लेश्चिच (युरोप) यांच्या माध्यमातून, ४.४.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक